पुणे | राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्ष संध्या सोनवणे यांच्यावर दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीचे पैसे लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुण्यात स्टुडंट हेल्पिंग हँड या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर आणि तत्कालीन सचिन व सध्याच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्ष संध्या सोनवणे यांच्यावर या संस्थेला आलेल्या निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संस्थेच्या नावावर लाखो रुपयांची उलाढाल करण्यात आली, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना फायदा मिळालेला नाही, असं धर्मादाय आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.