नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ब्रिटनच्या एका उद्योगपतीने आपल्या कंपनीचे प्रॉफिट शेअर्स आपल्याच कंपनीच्या कर्मचार्यांना वाटले आहेत. आता त्यांच्या कंपनीचे बहुतांश कर्मचारी कोट्यधीश बनले आहेत. उद्योगपतीने हे तेव्हा केले जेव्हा कंपनीचा शेअर वेगाने वर गेला आणि कंपनीला खूप मोठा प्रॉफिट झाला.
या कंपनीचे नाव आहे द हट ग्रुप, तर मालकाचे नाव आहे मॅथ्यू मोल्डिंग (Charing). मॅथ्यू यांनी आपल्या कंपनीच्या प्रॉफिटमधील 830 मिलियन पाउंड म्हणजे सुमारे 8183 कोटी रुपयांचे शेअर आपल्या कंपनीच्या कर्मचार्यांमध्ये वाटले. त्यांनी एक बाय बॅक स्कीम चालवली. ही सर्व कर्मचार्यांसाठी ओपन स्कीम होती.