आश्चर्यकारक! 'करोडपती' मलिंगा आई-वडिलांना दहा वर्षे भेटलेलाच नाही

Thursday, 26 Nov, 8.28 pm

श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू लसिथ मलिंगाने आत्तापर्यंत मोठे यश मिळवले आहे. जागतिक क्रिकेटमध्ये महान गोलंदाजांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. त्यामुळे जगभरातील अनेक टी२० क्रिकेट स्पर्धांसाठीही त्याला मागणी असते. त्यामुळे आत्तापर्यंत मलिंगाने कोट्यावधी रुपये कमावण्याबरोबरच जगभरात सन्मानही मिळवला आहे. पण असे असले तरी त्याच्यावर एका गोष्टीमुळे टीका होत असते. ती गोष्ट म्हणजे गेले १० वर्षे तो त्याच्या आई-वडीलांच्या घरी गेलेला नाही.

आई-वडीलांचा जगण्यासाठी संघर्ष

मलिंगा जरी कोट्यावधी रुपयांमध्ये खेळत असला तरी त्याच्या पालकांना मात्र जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्याची आई शिवणकाम करुन घर चालवते.