राजगुरूनगर : चार घरे आगीत भस्मसात

Monday, 25 Jan, 10.56 pm

राजगुरूनगर (प्रतिनिधी) - राजगुरुनगर शहरालगत असलेल्या थिगळस्थळ (ता. खेड) येथे राहत्या चार घरांना आग लागल्याने सुमारे 20 लाखांचे नुकसान झाले; सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही दुर्घटना रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली.

राजगुरुनगर नगरपरिषद हद्दीतील शासकीय विश्रामगृहाच्या मागील बाजूस नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात थिगळस्थळ येथे ही दुर्घटना घडली. या आगीत दोन राहत्या कुंटुंबांना या फटका बसला आहे. त्यांचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत चार कुटुंबाची पाच लाखांच्या रोख रकमेसह 15 तोळ्यांचे दागिने, धान्य, इलेक्‍ट्रॉनिक साहित्य, इलेक्‍ट्रॉनिक्‍स विक्रीचा दुकानातील मालासह वायरिंगचे जवळपास दीड लाखांचे साहित्य जळून खाक झाले झाले.