पुणे जिल्हा: विजयी उमेदवार जोमात पॅनल प्रमुख कोमात

Monday, 25 Jan, 12.37 pm

राहुल गणगे

पुणे - राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहे. त्यामुळे गावागावांतील पॅनलप्रमुख निवडून आलेल्या उमेदवारांवर करडी नजर ठेऊन आहेत. सरंपचपदाचे आरक्षण जाहीर होईपर्यंत आपल्या गटातील उमेदवार विरोधकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून संबंधित पक्षाच्या वरिष्ठ नेते वॉच ठेऊन आहेत. बहूतांश ग्रामपंचायतींवर निसटती सत्ता काबिज करणाऱ्या गटांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायत सदस्य सध्या आऊट ऑफ कव्हरेज आहेत. अशी चर्चा गावागावांत व कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

निवडून आलेला एक जरी सदस्य विरोधकांच्या गळाला लागला तर आपली सत्ता जाऊ शकते या चिंतेत पॅनल प्रमुख पडले आहेत.