बारामती : प्रजासत्ताक दिनाच्या 71 वा वर्धापनदिन बारामती येथे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम येथील रेल्वे मैदानावर पार पडला.
प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त येथील रेल्वे मैदानावर कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या संचलन पथकाचे निरीक्षण केले. पथकात शहर पोलीस पथक, अग्निशमन दल, यांचा समावेश होता. यानंतर सर्व पथकांनी संचालनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
मानवंदनेच्या कार्यक्रमानंतर बारामती करोना योध्दा सत्कार समारंभ करण्यात आला.