प्रजासत्ताक दिन : राजगुरूनगर सहकारी बँकेच्या वतीने शहिद जवान संभाजी राळेंच्या कुंटुंबाला आर्थिक मदत

Tuesday, 26 Jan, 3.55 pm

राजगुरूनगर (प्रतिनिधी) : राजगुरूनगर सहकारी बँकेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील कुरकुंडी गावातील शहिद जवान संभाजी राळे यांच्या कुंटुंबाला 51 हजार रुपयांची मदत देण्यात आली. मदतीचा धनादेश बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज यांच्या हस्ते शहिद जवान राळे यांच्या दोन्ही बहिणीकडे सुपूर्त करण्यात आज (दि.२६) आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राजगुरूनगर सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर सुप्रसिद्द व्याख्याते अशोक देशमुख यांनी बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.