पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

Thursday, 26 Nov, 2.13 pm

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी 28 नोव्हेंबरला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचे सांगितले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर चार डिसेंबरला 100 देशांचे राजदूत देखील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन तिथे सुरू असलेल्या कोरोना लसीच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार आहेत.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या या लसीकडे देशासह जगाचे लक्ष लागून आहे. त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या असून विभागीय आयुक्त कार्यालयात त्यासाठी एक बैठकही आयोजित करण्यात आली होती.