पंजाबमधून दिल्लीला जाणाऱ्या शेतकऱ्यांना हरियाणात अडवले

Thursday, 26 Nov, 9.04 pm

अंबाला, (हरियाणा) - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी दिल्लीला जात असलेल्या पंजाबच्या शेतकऱ्यांना आज हरियाणा पोलिसांनी अडवले. शेकडो ट्रॅक्‍टर आणि ट्रकमधून हे शेतकरी दिल्लीच्या मार्गावर असताना त्यांना अडवण्यासाठी हरियाणा पोलिसांनी दिल्लीपासून 200 किलोमीटर अंतरावरील शंभू इथल्या पंजाब-हरियाणा सीमेवर अडथळे उभे केले होते.

पोलिसांनी उभे केलेले अडथळे ओलांडून शेतकऱ्यांच्या जमावाने पंजाबच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी काही बॅरिकेड नदीमध्ये फेकून दिले. या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला. त्यामुळे घग्गर नदीवरील पूलावर शेतकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्‍चक्रीला सुरुवात झाली.