नायगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

Monday, 25 Jan, 10.46 pm

सोरतापवाडी - नायगाव ग्रामपंचायतीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही . सर्व मदत केली जाईल त्यासाठी सर्व नवनियुक्त सदस्यांनी सर्वांना बरोबर घेऊन गावाचा विकास करावा, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

नायगाव (ता. हवेली) ग्रामपंचायतीवर राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली श्री काळभैरवनाथ परिवर्तन पॅनेलने एक हाती सत्ता घेतली आहे. त्यात त्यांचे ८ उमेदवार विजयी झाले. तर हनुमंत अण्णा श्री काळभैरवनाथ पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाले. पुणे येथे विजयी उमेदवारांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार अशोक पवार , राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेक, राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.