मुखईमध्ये मातब्बरांना पराभवाची धूळ

Sunday, 24 Jan, 7.53 pm

केंदुर (पुणे) - मुखई (ता. शिरूर) येथील नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार सूर्यकांत पलांडे आणि शिवसेना नेत्या, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पालांडे यांच्या स्वाभिमानी गावकरी पॅनेलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. ग्रामपंचायत निवडणुकीत या मातब्बरांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर पलांडेंसह इतर प्रमुख मंडळींनी एकत्र येत श्री काळभैरवनाथ ग्रामविकास आघाडीने सहा जागा मिळवल्या आहेत.

दरम्यान, वॉर्ड एक मधील महेंद्र शानुर काळे, वॉर्ड तीन मधून संगीता रमेश पलांडे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी महेंद्र काळे हे श्री काळभैरवनाथ ग्रामविकास आघाडीच्या गटाला मिळाले तर संगीता पलांडे या स्वाभिमानी गावकरी पॅनेलकडे जाऊन मिळाल्या.