.म्हणून सुशील कुमार मोदींचे 'ते' ट्विट ट्विटरने केले डिलीट

Thursday, 26 Nov, 2.45 pm

मुंबई - भाजपचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे ट्विट ट्विटरकडून डिलीट करण्यात आले आहे. सुशील कुमार मोदी यांनी राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर सरकार पाडण्यासाठी कट रचत असल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र, मोदी यांचे ट्विट आचारसंहितेचे भंग करत असल्याने ट्विटरकडून डिलीट करण्यात आले आहे.

सुशील कुमार मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप करताना कॉलचा उल्लेख केला होता. त्यातच त्यांनी तो मोबाईल नंबरही शेअर केला होता. ट्विटमध्ये मोबाईल नंबर देणे ट्विटरच्या आचारसंहितेचा भंग असून, त्या कारणामुळे ट्विटरने हे ट्विट डिलीट केले आहे.

काय आहे प्रकरण?