"कुठेही गोंधळ गडबड करायची नाही, तोडफोड करायची नाही'.

Thursday, 26 Nov, 1.08 pm

मुंबई : वाढीव वीजबिलाविरोधात राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाले असून त्यात मनसेदेखील आक्रमक झाली आहे. आज राज्यभरात ठिकठिकाणी मनसेकडून आंदोलन केले जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसहित अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत असून राज्य सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई केली असून अटक केली आहे. तर काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी सक्त आदेश दिल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

मुंबईत वांद्रे येथे बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला आहे.