जम्मू-काश्मीर : श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला

Thursday, 26 Nov, 4.09 pm

श्रीनगर : मध्य काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्याच्या एचएमटी परिसरात गुरूवारी दुपारी दहशतवाद्यांनी पुन्हा भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील एचएमटी परिसरात सुरक्षा दलाच्या टीमवर दहशतवाद्यांनी गोळीबार करत हल्ला केला आणि त्यानंतर दहशतवादी तेथून फरार झाले. या परिसरास सुरक्षा दलाच्या जवानांनी घेराव घातला आहे. तसेच सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.

काश्मीरचे महानिरीक्षक (आयजी) दिलेल्या माहितीनुसार, तीन दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला.