'जल्लीकट्टू' चित्रपटावरून कंगनाचा बॉलिवूड माफियांवर हल्ला, म्हणाली.

Thursday, 26 Nov, 2.01 pm

मुंबई - ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे जलिकट्टु या चित्रपटाला अधिकृतपणे नामांकन देण्यात आले आहे. 93 व्या अकादमी पुरस्कारासाठी फिचर फिल्म गटात भारताची ही अधिकृत एन्ट्री असणार आहे. लिजो जोस पेलीसेरी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे ही घोषणा करण्यात आली आहे. या फेडरेशन कडे ऑस्करमध्ये एन्ट्री मिळावी म्हणून एकूण 27 चित्रपट दाखल झाले होते.

दरम्यान, ही बातमी व्हायरल होताच बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने ट्विट करत पुन्हा बॉलिवूडवर टीका केली आहे. 'चित्रपट माफिया टोळी त्यांच्या घरात लपून बसली असल्याने, ज्यूरीला त्यांचे काम करण्याची मुभा मिळाली आहे.