घरकुलाची लॉटरी कोणाला लागणार?

Thursday, 22 Oct, 11.48 am

ऑनलाइन सोडत दि.24 रोजी : पालिकेच्या संकेतस्थळावर लाइव्ह प्रसारण

पुणे - महापालिकेमार्फत होणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 5 प्रकल्पांसाठीच्या घरकुलांची सोडत ऑनलाइन पद्धतीने दि.24 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीतील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ही सोडत होणार असून, सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती असणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याविषयी माहिती दिली.