एक राष्ट्र एक निवडणूक यावर चर्चा आवश्‍यक - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Thursday, 26 Nov, 6.57 pm

नवी दिल्ली - एका राष्ट्र एक निवडणुक या मुद्यावर चर्चा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक पंचायत पातळीवर निवडणूक एकाचवेळी यावर देशपातळीवर चर्चा होणे आवश्‍यक आहे.

या सर्व निवडणुकांसाठी एकच मतदार यादी वापरली जाऊ शकते. विधिमंडळ कार्यात वापरल्या जाणाऱ्या डिजिटल नवकल्पना या कामी प्रत्यक्षात आणल्या पाहिजेत असे ते म्हणाले. मोदी आज गुजरातमधील केवडिया येथे आयोजित केलेल्या 80 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोप सत्राला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.

आजचा दिवस हा गांधीजींची स्फूर्ति आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची वचनबद्धता यांचे स्मरण करण्याचा आहे.