दौंडमध्ये शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

Tuesday, 26 Jan, 5.54 pm

दौंड - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरातमध्ये शेकडो तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे दौंड शहर प्रमुख आनंद पळसे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील तरुणांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा उपप्रमुख महेश पासलकर, तालुकाप्रमुख देविदास दिवेकर, उपतालुकाप्रमुख दीपक चव्हाण, युवा सेनेचे समीर भोईटे उपस्थित होते. यावेळी प्रवेश केलेल्या तरुणांचे महेश पासलकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून हातात भगवा ध्वज देत त्यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमात शंभरहून अधिक तरुणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.