मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. हात धुवा हे सांगण्याव्यतिरीक्तही मी हात धुवून मागे लागू शकतो, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे भाजपला दिला आहे.
ज्या मुलाखतीतून आणि ज्या व्यक्तींकडून महाराष्ट्राला काही मिळत नाही अशा फुकट्या लोकांना बघायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही. चंगू मंगू च्या फालतू गप्पा. https://t.co/2RV89hZaQX
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 26, 2020
या मुलाखतीवरून आता निलेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, ' ज्या मुलाखतीतून आणि ज्या व्यक्तींकडून महाराष्ट्राला काही मिळत नाही, अशा लोकांना बघायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही.