BREAKING NEWS : पुणे जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण येत्या शुक्रवारी

Monday, 25 Jan, 10.23 pm

पुणे - जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतीच्या निवडणूका नुकत्याच झाल्या आहेत. मात्र या ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले नव्हते.

आता जिल्हा प्रशासनाने सरपंच पदाचे आरक्षणाची तारिख जाहीर केली आहे, त्यानुसार येत्या शुक्रवारी दि.29 जानेवारी रोजी तालुक्याच्या ठिकाणी ही सोडत होणार आहे.

त्यासाठी उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता येणार हे उघड होणार आहे, ग्रामपंचायत सोडतीकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा