#AUSvIND : मयंकला सलामीला पाठवणे योग्य

Thursday, 26 Nov, 8.04 pm

मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यांच्या मालिकेत नवोदित मयंक आगरवाल खेळणार हे नक्‍की झाले आहे. कारण सध्या तो फलंदाजीत मोठ्या खेळी करत आहे. जर रोहित शर्मा कसोटीमध्ये उपलब्ध होऊ शकणार नसेल तर मयंकला सलामीवीर म्हणूनच खेळवावं. तसेच दुसरा सलामी फलंदाज म्हणून इतर खेळाडूच्या फॉर्मचा विचार करण्यात यावा, असं मत विक्रमवीर फलंदाज सचिन तेंडुलकर यानं व्यक्‍त केलं आहे.

विस्फोटक फलंदाज मयंक आगरवालची पहिल्यांदाच तिन्ही प्रकारच्या भारतीय संघात निवड झाली आहे. त्यावर सचिनने हे मत व्यक्‍त केल्यानं त्याचं महत्त्व अधोरेखित होत आहे.

मयंकने नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये दमदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधलं होतं.