अनाहुत मेसेज का रोखले नाहीत

Thursday, 26 Nov, 8.16 pm

डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना होत आहे मनस्ताप

नवी दिल्ली - दूरसंचार नियामक अधिकारिणी म्हणजे ट्रायने अनाहुत मेसेज न रोखल्याबद्दल मोबाइल सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना 35 कोटी रुपयांचा दंड केला आहे. ज्या कंपन्यांना दंड करण्यात आला आहे त्यामध्ये एअरटेल, बीएसएनएल, जिओ, व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांचा समावेश आहे.

सायबर क्रिमिनलनी पाठवलेले बनावट मेसेज डिजिटल पेमेंट वापरणाऱ्यांना पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चौकशी करून ट्रायने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. एमटीएनएल, व्हिडिओकॉन, टाटा टेलिसर्व्हिसेस या कंपन्यांनाही दंड करण्यात आला आहे.