नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते विरोधी पक्षातील नेत्यांपासून सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून अमित शाह यांना शुभेच्छा देत आहेत.
दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही अमित शाह यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी अमित शाह यांचा उल्लेख आधुनिक भारताचे चाणक्य असा केला आहे.
आधुनिक भारत के चाणक्य श्री @AmitShah जी को जन्मदिन की बहुत बहुत बधाइयाॅं ! #HappyBirthdayAmitShah #AmitShah #Chanakya pic.twitter.com/d0mIq9PR7j
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 22, 2020
अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आधुनिक भारताचे चाणक्य अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.