91 वर्षीय आजोबांकडून किल्ले शिवनेरी सर

Tuesday, 26 Jan, 4.29 pm

जुन्नर (प्रतिनिधी) - बेळगावच्या बैजु पाटील या 91 वर्षीय तरुणाने किल्ले शिवनेरी सर करीत छत्रपती शिवरांयाप्रती आदर व्यक्‍त केला. या वयातही त्यांचा सळसळता उत्साह आजच्या पीढिला आदर्शवत ठरणारा असाच आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी किल्ले शिवनेरीचे दरवाजे पर्यटक आणि शिवभक्तांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर शासनाने काही नियम व अटी यांचे बंधन कायम ठेवून धार्मिक स्थळे तसेच पर्यटन स्थळ यावरील बंदी शिथिल केली आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ आता सर्वत्रच वाढताना दिसून येत आहे.

किल्ले शिवनेरी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असल्याने देशभरातून नागरिक या पवित्र भूमीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.